राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त
सातारा : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा यांनी 19 नोव्हेंबर 2026 रोजी निरा लोणंद मार्गावर पाडेगाव गावाच्या हद्दीत हजरत पठाणशहा बाबादर्गा समोर सापळा रचून अवैध हातभट्टी दारुच्या वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून रु. 5 लाख 22 हजार 200 किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी दिली.
करण्यात आलेल्या कारवाईत 35 लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे 6 कॅन हातभट्टी दारुने भरलेले. (एकूण 210 लिटर हातभट्टी दारु), व्होल्सवॅगन कंपनीचे पोलो मॉडेलचे चारचाकी वाहन जिचा क्र. एमएच-12-एचएल-4297(वाहनाची किंमत 5 लाख रु.) जप्त करण्यात आले या जप्ती मुद्देमालाची एकूण किंमत रु. 5 लाख 22 हजार 200 रुपये इतकी आहे.
यातील आरोपी रितीक विशाल चव्हाण, वय 27 वर्षे, रा. जेऊर ता. पुरंदर, जि. पुणे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अमंलबजावणी व दक्षता महाराष्ट राज्य सह आयुक्त प्रसाद सुर्वे, यांचे निर्देशानुसार करण्यात आले.
जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याहो प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.



