महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आढावा बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का? राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन
Home » राज्य » राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर ते शुक्रवार, १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य अनिल परब, विक्रम काळे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत सविस्तर चर्चा करून ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३

बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket