महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आढावा बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का? राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

सातारा (अली मुजावर )-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन; पण सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न किती मोठे? असा प्रश्न साताऱ्याच्या जनतेला पडलेला आहे.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या ‘रचना २०२६’चे २६ नोव्हेंबरला उद्घाटन आहे  हे प्रदर्शन की बांधकाम प्रकल्पांचे मार्केटिंग? असणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर  दोन वर्षातून होणारा हा एक्सपो कितपत सातारकरांना रुचेल हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम विषयक प्रदर्शन म्हणून ‘रचना २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.मात्र, या भव्य प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बांधकाम क्षेत्रातील प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञान, गृहसंकुले आणि विविध व्यावसायिक संधींची माहिती देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश असला, तरी प्रत्यक्षात सामान्य घरखरेदीदाराला यातून काय मिळणार? साताऱ्यात घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याची चर्चा असताना मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या आर्थिक आवाक्यातील घरांचे पर्याय किती उपलब्ध करून दिले जाणार आहेत?

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन असा दावा केला जात असताना ग्राहकांच्या हितासाठी कोणत्या विशेष सुविधा असणार आहेत? सहभागी बांधकाम प्रकल्पांची RERA नोंदणी, बांधकामाची गुणवत्ता, घरांचा ताबा, पार्किंग व्यवस्था, किंमत आणि प्रत्यक्ष उपलब्ध सवलती याबाबत पारदर्शक माहिती दिली जाणार का? की आकर्षक स्टॉल, मोठ्या जाहिराती आणि प्रकल्पांचे मार्केटिंग एवढ्यापुरतेच हे प्रदर्शन मर्यादित राहणार?

बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने ग्राहकांच्या तक्रारी, अपूर्ण प्रकल्प आणि घर खरेदीदारांच्या अडचणी यांवरही स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. केवळ बांधकाम क्षेत्राची भव्यता दाखवण्यापेक्षा या क्षेत्रातील जबाबदारी आणि पारदर्शकता अधोरेखित होणे अधिक महत्त्वाचे आहे.

भव्य प्रदर्शन, मोठे दावे आणि आकर्षक जाहिराती यापलीकडे जाऊन रचना २०२६ सर्वसामान्य घरखरेदीदारांच्या प्रश्नांना किती न्याय देणार, याचे उत्तर प्रदर्शनाच्या आयोजनातून मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा ‘सर्वात मोठे प्रदर्शन’ हा केवळ मार्केटिंगचा दावा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३

बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket