महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आढावा बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का? राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

सातारा दि. १८ स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मौजे पाल, ता. कराड येथे १ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या मैला गाळ व्यवस्थापन (Fecal Sludge Management) प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, मैला गाळाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे, तसेच नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत पाल गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

सदर प्रकल्पात प्रामुख्याने कराड तालुक्यातील ५१ गावांचा समावेश असून, सेप्टीक टाक्यांमधील मैला संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी शासनामार्फत मैला वाहतुकीसाठी विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टायगर बायो फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर

सदर प्रकल्पामध्ये जमा केलेल्या मैल्यावर टायगर बायो फिल्टर या आधुनिक प्रणालीद्वारे पाणी शुद्धीकरण आणि खतनिर्मिती केली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार असून, तयार होणारे खत विक्री करून ग्रामपंचायत पाल यांना देखील आर्थिक फायदा होणार आहे.

या उद्घाटन समारंभास आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सुरेशतात्या पाटील, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्के, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपअभियंता जयदीप पाटील जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे, राजेश भोसले,अजय राऊत दादासो यादव, रणजीत पाटील, शंकरकाका शेजवळ, शिरगावचे सरपंच संतोष यादव पाटील, नागठाणेचे उपसरपंच अनिल साळुंखे, उपअभियंता,बांधकाम विभाग,माधव पाटील, सतीश शिंदे, पापा गोरे, संतोष पाटील, ऋषिकेश गोरे, सरपंच धनंजय घाडगे, उप सरपंच सुनीलनाना काळभोर, सुरेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी डी आर केंगार यांच्यासह ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३

बिल्डरांना प्रसिद्धीचे व्यासपीठ, ग्राहकांना न्यायाचे व्यासपीठ कधी? रचना २०२६ समोर सवाल! पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रदर्शनाचा दावा; घरखरेदीदारांच्या तक्रारी, हक्क आणि पारदर्शकतेवरही प्रकाश पडणार का?

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket