Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीकडून डॉ. उमेश सुतार यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान

एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीकडून डॉ. उमेश सुतार यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान 

एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीकडून डॉ. उमेश सुतार यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान 

तीन दशकाहून अधिक वर्षांच्या पत्रकारिता, साहित्यिक व सामाजिक कार्याचा बहुमान

उंब्रज :तिर्थक्षेत्र चाफळ येथील पत्रकार, साहित्यिक डॉ. उमेश बाबासो सुतार यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे सर्वोच्च सन्मानीय ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान सोहळा कोल्हापूर येथे डॉ. विक्रम शिंगाडे, अँड. प्रिती कोळी यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी डॉ. उमेश सुतार यांनी त्यांना मिळालेली डॉक्टरेट पदवी त्यांचे मार्गदर्शक वडील स्व. बा मा. सुतार (दादा) यांना समर्पित केली.डॉ.उमेश सुतार हे गेली 32 वर्षे पत्रकारिता, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. घरोघरी पेपर वाटण्यापासून ते संपादकीय पर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास उल्लेखनीय असा आहे. पत्रकारिते बरोबरच त्यांनी 1995 ते 2015 या काळात रामानंद वाचनालय येथे ‘ग्रंथपाल’ पदावर तब्बल 21 वर्षे काम करून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे मोठे कार्य केले आहे.

  डॉ. सुतार यांच्या आजवरच्या अष्टपैलू कार्याला अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकार रत्न पुरस्कार, आदर्श पत्रकार, कवीरत्न पुरस्कार, आदर्श ग्रंथपाल पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त शांतता पुरस्कार, स्वदेशी भारत सन्मान, समाज गौरव पुरस्कार, आदर्श उपसंपादक पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार, उत्कृष्ट काव्य रचना सन्मान, पंचवदन चा विशेष पुरस्कार, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांमधून दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श कवीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘मानद डॉक्टरेट’मुळे डॉ. उमेश सुतार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, चाफळ विभागासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज!

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज! नाळेवाडीतील दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ल्याने चिंता वाढली; गोडोलीत कुत्र्याचे पिल्लू पळविल्याची घटनाही CCTVमध्ये

Live Cricket