Home » ठळक बातम्या » स्पोर्ट्स » २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, जपान-२०२६ मधील पदकप्राप्त खेळाडूंची गौरव रॅली व सत्कार समारंभामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, जपान-२०२६ मधील पदकप्राप्त खेळाडूंची गौरव रॅली व सत्कार समारंभामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, जपान-२०२६ मधील पदकप्राप्त खेळाडूंची गौरव रॅली व सत्कार समारंभामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सातारा -नागोया-जपान येथे सुरु असलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील साहील जाधव यांनी आर्चरी खेळातील कपांऊड क्रीडा प्रकारात ०२ सुवर्ण पदक, ऋतुजा पिसाळ हिने हॉकी खेळात सुवर्ण पदक, सुदेष्णा शिवणकर हिने मैदानी खेळातील ४x100 मी. रिले या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन चौथा क्रमांक संपादन करण्याची ऎतिहासिक कामगिरी केली आहे.

खेळाडूंनी संपादन केलेले हे अभूतपूर्व यश सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने गौरव रॅलीचे आयोजन दिनांक ०५ ऑक्टोंबर, २०२६ रोजी सकाळी ०७:३० वा. गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या मार्गावर करण्यात आले आहे.

सदर रॅलीमध्ये मा. जिल्हाधिकरी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. पोलीस अधिक्षक तसेच विविध विभागांचे अधिकारी/कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच सातारा शहरातील २० शाळा ०५ महाविद्यालयाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे विविध खेळांच्या अकॅडमीचे खेळाडू यावेळीस उपस्थित राहणार आहेत. 

तरी जिल्ह्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे क्रीडा मार्गदर्शक, पालक यांच्या रॅली व सत्कार समारंभामध्ये खेळाडू, क्रीडाप्रेमी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्‍लवी धात्रक यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज!

बिबट्यांचा वाढता वावर; आता ठोस उपायांची गरज! नाळेवाडीतील दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ल्याने चिंता वाढली; गोडोलीत कुत्र्याचे पिल्लू पळविल्याची घटनाही CCTVमध्ये

Live Cricket