साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त
Home » खेळा » क्रिकेट » दुबळ्या आयर्लंड कडून भारताचा ३४ धावांनी पराभव

दुबळ्या आयर्लंड कडून भारताचा ३४ धावांनी पराभव

 दुबळ्या आयर्लंड कडून भारताचा ३४ धावांनी पराभव

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दोन टी २० सामन्यातील पहिल्या सामन्यात आयर्लंड संघाने प्रथमच भारतीय संघाचा ३४ धावांनी पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाने गोलंदाजी स्वीकारली होती.आयर्लंड संघाकडून डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती.परंतु कर्णधार टकरचे अर्धशतक आणि डेलेनी यांच्या ४९ धावांच्या जोरावर आयर्लंड संघाने १८२ धावा केल्या.सामन्यात भारतीय संघाकडून प्रसिद्ध कृष्णा सर्वात महाग ठरला.

प्रत्युत्तरासाठी आलेल्या भारतीय संघाला संजू सॅमसन च्या रूपात पहिला धक्का बसला.सलामीवीर अभिषेक शर्मा एक बाजू धरून होता मात्र त्याच्या सोबत येणारा खेळाडू फक्त जणू हजेरी लाऊन जात होता.अभिषेक शर्मा देखील ४९ धावांवर बाद झाला.त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे ने थोडा वेळ मैदानावर घालवला मात्र त्यांना देखील यश मिळाले नाही.आज पहिल्यांदाच आयर्लंड संघाने भारतीय संघाचा पराभव करत सर्वांना धक्का दिला.दोन सामन्यांच्या मालिकेत आता आयर्लंड संघाने १-० अशी आघाडी घेत मालिकेवर वर्चस्व राखले आहे.पुढील सामना जिंकून ते प्रथमच मालिका जिंकणार असे वाटत आहे.श्रेयस अय्यर याच्या कर्णधार पदाची सुरवात मात्र खराब झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा

साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा सातारा : यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ.

Live Cricket