नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » लडाखमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

लडाखमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

लडाखमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

लडाखमधील लेहजवळच्या तांगस्ते भागात भारतीय लष्कराचं ‘चिता’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामधून ३ वरिष्ठ लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, ही अपघाताची घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबतची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे तीन वरिष्ठ अधिकारी होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल मेजर आणि जनरल ऑफिसर कमांडिंग सचिन मेहता हे प्रवास करत होते. या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

लेहजवळच्या तांगस्ते भागात लष्कराचं चिता हे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचा सेल्फी व्हायरल होत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरजवळ दोन अधिकाऱ्यांबरोबर बसलेल्या मेजर जनरल सचिन मेहता यांचा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.

तांगस्ते परिसरात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेची चौकशीचे करण्यात येणार आहे, या संदर्भात लष्कराने अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड की खराब हवामान यासह सर्व संभाव्य कारणांची तपासणी केली जाणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket