नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » महाबली पैलवान तथा छत्रसाल आखाड्याचे प्रमुख माननीय सतपाल सिंग (दिल्ली) यांची पै. जीवन कापले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

महाबली पैलवान तथा छत्रसाल आखाड्याचे प्रमुख माननीय सतपाल सिंग (दिल्ली) यांची पै. जीवन कापले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

महाबली पैलवान तथा छत्रसाल आखाड्याचे प्रमुख माननीय सतपाल सिंग (दिल्ली) यांची पै. जीवन कापले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

सातारा -सातारा येथे दिमाखात संपन्न झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेनंतर पद्मश्री, पद्मविभूषण, हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तुम-ए-हिंद, ऑलिम्पिक वीर असे भारतातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाचे किताब पटकावणारे महाबली पैलवान तथा दिल्ली येथील प्रसिद्ध छत्रसाल आखाड्याचे प्रमुख माननीय सतपाल सिंग यांनी पै. जीवन कापले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत भोजनाचा आस्वाद घेतला. भारताला सुशील कुमार, योगेश्वर दत्त यांच्यासारखे ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल घडविणारे गुरु म्हणूनही त्यांचा देशभर गौरव केला जातो.

या प्रसंगी महान महाराष्ट्र केसरी माणिक पवार, महाराष्ट्र केसरी सुधीर नाना पवार तसेच सातारा जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी उपस्थित होते. कुस्ती परंपरा, मातीशी असलेले नाते, आखाड्याची संस्कृती आणि नव्या पिढीतील मल्लांना घडविण्याबाबत मनमोकळ्या चर्चा रंगल्या.

यावेळी सतपाल सिंग यांनी साताऱ्यात अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेबद्दल गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा देशासाठी प्रेरणादायी असून साताऱ्याने केलेले आयोजन राष्ट्रीय स्तरावर आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील मल्लांना मिळणारे व्यासपीठ भविष्यात देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या सदिच्छा भेटीत कुस्ती क्षेत्रातील जिव्हाळा, आपुलकी, परंपरेचा सन्मान आणि मातीवरील प्रेम अनुभवायला मिळाले. उपस्थितांनी माननीय सतपाल सिंग यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket