सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

यशोदा टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्त दर्जा’ चा बहुमान; तंत्र शिक्षणामध्ये नवीन उपक्रमांना प्राधान्य

सातारा : महाराष्ट्रातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा या संस्थेला आता स्वायत्त (Autonomous) दर्जा प्राप्त झाला आहे. इंजीनियरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, आर्किटेक्चर, एमबीए,एमसीए, बीबीए, बीसीए यासारख्या अभ्यासक्रमातून उच्च व तंत्र शिक्षणातील गुणवत्तावाढ, अभ्यासक्रमातील नाविन्यपूर्णता आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी हा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मान्यतेमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसला अभ्यासक्रम रचना, अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये अधिक स्वायत्तता मिळणार आहे.

या स्वायत्त दर्जामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत असे अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येणार आहेत. त्याचबरोबर संशोधन, स्टार्टअप, उद्योजकता आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांनाही अधिक चालना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण न देता त्यांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

स्वायत्ततेमुळे संस्थेला परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनविणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे सतत मूल्यमापन करणे तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यासही मोठी मदत होणार आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने कुलसचिव, सहसंचालक, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पालक तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पसला प्राप्त झालेला स्वायत्त दर्जा हा आमच्या संपूर्ण संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत. या प्रयत्नांची दखल घेऊन मिळालेली ही मान्यता म्हणजे आमच्या संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांच्या परिश्रमांचे फळ आहे. स्वायत्ततेमुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी अधिक आधुनिक, उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्याची संधी मिळणार आहे.” 

संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांनी यावेळी सांगितले की, “आजच्या वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक जगात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये देणे अत्यंत गरजेचे आहे. स्वायत्त दर्जामुळे आम्हाला अभ्यासक्रमात नाविन्यपूर्ण बदल करण्याची आणि उद्योग क्षेत्राशी अधिक मजबूत संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. संशोधन, स्टार्टअप, इन्क्युबेशन आणि उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्येही आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकू. यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे केंद्र म्हणून पुढे येईल.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket