नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड तालुक्यातील येळगाव फाटा मार्गावर वीज खांबाचे निकृष्ट काम

कराड तालुक्यातील येळगाव फाटा मार्गावर वीज खांबाचे निकृष्ट काम

कराड तालुक्यातील येळगाव फाटा मार्गावर वीज खांबाचे निकृष्ट काम

कराड प्रतिनिधी –कराड तालुक्यातील येळगाव फाटा ते येळगाव दरम्यान महावितरण तर्फे उभारण्यात आलेल्या वीज खांबांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा तक्रारी व वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या मार्गावर अनेक ठिकाणी वीज खांब थेट गटारातच उभे करण्यात आलेले दिसून येत आहेत, तर काही खांब गटाराच्या कडेला धोकादायक स्थितीत बसवण्यात आले आहेत. उभारण्यात आलेल्या खांबांच्या पायाभूत काँक्रीटला तडे गेलेले असून काम करताना योग्य प्रकारे पाण्याचा वापरही करण्यात आलेला नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. त्यामुळे या खांबांची टिकाऊपणा संशयास्पद ठरत आहे.

कंत्राटदारांना मोठे करण्याच्या नादात निकृष्ट दर्जाची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या प्रकारामुळे भविष्यात वीज खांब कोसळण्याचा धोका निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच कामाची सखोल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket