नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » सातारा जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी; तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी-आमदार मलेंद्र राजन

सातारा जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी; तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी-आमदार मलेंद्र राजन

सातारा जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी; तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी-आमदार मलेंद्र राजन

सातारा (प्रतिनिधी):सातारा जिल्ह्यात इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तालुका आणि गाव पातळीवर व्यापक मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

पक्षाच्या तालुका अध्यक्ष व इतर निवडी लवकरच करण्यात येणार असून, तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संघटन मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेश चे आमदार मलेंद्र राजन , आ.अभिजित कदम आणि रणजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात संघटनात्मक बदल राबविले जाणार आहेत.यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, “संगठन सृजन अभियान” या मोहिमेद्वारे काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण करण्याच्या तयारीत असून, गावागावात पक्षाची पकड मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket