Home » राज्य » प्रशासकीय » राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना– अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

मुंबई: राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून महाराष्ट्रात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत अपर मुख्य सचिव डिग्गीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘पीआयबी’च्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, तेल उत्पादक राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, कृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा पुणे, दि.२८: महाराष्ट्र

Live Cricket