नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » साताऱ्याचा सुपुत्र आता दिल्ली मेट्रोचा ‘सुरक्षा कवच’ -आयपीएस संतोष चाळके यांची नियुक्ती!

साताऱ्याचा सुपुत्र आता दिल्ली मेट्रोचा ‘सुरक्षा कवच’ -आयपीएस संतोष चाळके यांची नियुक्ती!

साताऱ्याचा सुपुत्र आता दिल्ली मेट्रोचा ‘सुरक्षा कवच’ –आयपीएस संतोष चाळके यांची नियुक्ती!

 राजस्थान गाजवलं, आता दिल्ली मेट्रो सुरक्षित करणार; सातारच्या सुपुत्राची मोठी झेप!

कर्तृत्वाचा ‘मेट्रो’ प्रवास साताऱ्याच्या मातीतील जिद्द आणि दिल्लीचे मैदान

भुईंज  (पत्रकार महेंद्रआबा जाधव)आपल्या तडफदार कामगिरीने प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे आय. पी. एस. अधिकारी संतोष चाळके यांची दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

​साताऱ्याच्या मातीने देशाला अनेक शूरवीर आणि सनदी अधिकारी दिले आहेत. याच परंपरेतील चाळकेवाडी ता. जि. सातारा गावातील एक झळाळते नाव म्हणजे आयपीएस संतोष चाळके. आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ गुन्हेगारांवर वचक बसवला नाही, तर ‘जनतेचा पोलीस’ ही आपली प्रतिमा सार्थ ठरवली.

-​राजस्थानमध्ये पोलीस अधीक्षक असताना त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाया आजही तिथली जनता विसरलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि थेट जनसंपर्क ही त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.

सीबीआय आणि सीआयएसएफ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये डीआयजी म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर, आता त्यांच्याकडे दिल्ली मेट्रोच्या ७५ लाख प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १३ हजार जवानांचे नेतृत्व करताना सातारचा हा सुपुत्र पुन्हा एकदा आपली ‘तडफदार’ ओळख सिद्ध करेल यात शंका नाही.

आयपीएस संतोष चाळके यांची दिल्ली मेट्रोच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदी झालेली नियुक्ती ही केवळ साताऱ्यासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket