९७ गावांत जलसमृध्दीसाठी प्रशिक्षण पॅटर्न
अटल भूजल योजनेंर्तगत माण, खटाव, वाई तालुक्यात तज्ञांची प्रशिक्षणे
सातारा -प्रतिनिधी पावसाचे पाणी हाच मानवी जीवनाचा मुख्य आधार आणि पाण्याशिवाय जगता येणार नाही, पाण्याची भिषणता हेच मानवी अस्तित्वासाठी धोकादायक ठरणार असल्याचे प्रत्येकाला समजत आहे. तरी ही पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारणाची कामे, पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रभावी काम झाले नाही. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने जवळ आलेले जलसंकट थोपविण्यासाठी महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संशोधनातून भूजल पातळीवाढविण्यासाठी विविध मार्गदर्शक विषय निश्चित केले आहेत. केंद्र शासन पृरकृत आणि जागतिक बँकेच्या निर्देशाप्रमाणेअटल भूजल योजनेत सातारा जिल्हयातील माण ३५, खटाव ३१, वाई ३०, महाबळेश्वर १ अशा ९७ गावांचा समावेशकरण्यात आला आहे. या प्रत्येक गावांला भूजल समृध्दी आणण्यासाठी जल अंदाजपत्रकावर आधारीत जल सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी पुढील ६ महिने ६ वेगवेगळ्या विषयावर रयत शिक्षण संस्थेच्या पंचायतराज प्रशिक्षण केंद्राकडून तज्ञ प्रशिक्षक या गावात घेत असलेली महत्वपुर्ण प्रशिक्षणे भविष्यासाठी अत्यंत उपयुक्तठरणार असल्याचे सातारा जिल्हयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी प्रकाश बेडसे यांनी सांगितले.
“भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग कडून लोकसहभातून भूजल व्यवस्थापनाची अटल भूजल योजना राबविण्यात आहे. यात भूजल पातळी खालावलेल्या गावांचा समावेश असून सातारा जिल्हयात माण, खटाव, वाई, महाबळेश्वर तालुक्यातील ९७ गावांचा समावेश आहे. पाण्याच्या नियोजनाचा अभाव, अती वापर, जल संधारणाची कामे करून ही अनेक गावातील भूजल पातळी खालावलेली आहे. तर काही गावांनी अशी कामेच केली नाहीत. सध्या अटल भूजल योजनेतंर्गत भूजल पातळी उंचाविण्यासाठी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून ग्रामस्तवर जावून नागरिकांना संशोधनात्मक असलेल्या ६ विषयांची प्रशिक्षण दिली जात आहेत. हे विषय समजून घेतल्यास भविष्यात ही गावे भूजल समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत असून भविष्यात दुष्काळी नव्हे तर पाणीदार गाव म्हणून ओळखली जातील,” असा विश्वास प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.
८ तज्ञ प्रशिक्षकांची टीम
यशदाकडून सदरच्या प्रशिक्षणासाठी जिल्हयात आठ तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे. या गावातदर १५ दिवसांनी एक असे सहा वेगवेगळया विषयावर ९७ गावात प्रशिक्षण घेतली जाणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे अनुभवी, तज्ञ प्रशिक्षकांची टीम सध्या माण तालुक्यात प्रविण प्रशिक्षक म्हणून वैभव जगदाळे, दत्तप्रसाद कदम तर खटाव तालुक्यात रघुनाथ जगताप, ज्ञानदेव सकुंडे, अमर लोखंडे, विजय अवघडे तर वाई तालुक्यात दिव्यराज बनसोडे, अनिल क्षिरसागर हे प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानातून गावांनी लोकसहभागातून जलसमृध्दीसाठी सर्वोत्तम प्रयत्न करावेत, असे आवाहन यशदाच्या
जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांनी केले आहे.
वाई तालुका
पसरणी, बावधन, कन्नूर, आकोशी, एकसर , दसवडी परतवडी, बलकवडी, बोरगाव, दहयाट, विठ्ठलवाडी, वयगाव, कुसगाव, दरेवाडी, मुगाव, चिखली, बोरीव, व्याजवाडी, जोर, यशवंतनगर, कोंडवली, आसले, धावली मालकपूर, कडेगाव,नांदगणे, पांढऱ्याचीवाडी, अनपटवाडी, व्याहळी, नागेवाडी, गोळेवाडी महाबळेश्वर तायघाट
माण तालुका
पिंगळी बु., उकिर्डे, पिंगळी खु. सुरूपखानवाडी, कोळेवाडी, पांढरवाडी, महिमानगड, दिवडी, शिंदी बुद्रुक, कासारवाडी, मलवडी, शिरवली, परकंदी, नरवणे, सत्रेवाडी, दोरगेवाडी, शिंदी खुर्द, काळेवाडी, भांडवली, बिदाल, किरकसाल, कुळकजाई,पिंपरी, वारुगड, पळशी बोडके, मनकर्णवाडी, आंधळी, लोधवडे, गोंदवले बु. श्रीपालवण, बोथे, गोंदवले खुटाकेवाडी, दहिवडी
खटाव तालुका
उंबरमळे, हिंगणे, कटगुण, डाळमोडी, निढळ, बोंबाळे, पुसेगांव, येरळवाडी, नेर फडतरवाडी, एनकूळ, धारपुडी, खातवळ,सातेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी खटाव, यलमारवाडी, बनपुरी, डांबेवाडी, भुरकवडी, पळसगांव, पेडगाव, तडवळे, कणसेवाडी,दरजाई, कातरखटाव, वाकेश्वर, वडूज, गणेशवाडी, दरुज, पुसेगांव, कातळगेवाडी
५ प्रशिक्षणातील विषय
१)शेतीसाठी व घरगुती वापरासाठी पाणी बचतीचे तंत्रज्ञान आणि उपाययोजना
२- लोकसहभागातून जल अंदाजपत्रकावर आधारित जलसुरक्षा आराखडा
३- शेतकरी उत्पादक कंपनी शेती माल उत्पादन आणि बाजारपेठेशी जोडणी
४- जलसंधारण व भूजल पुर्नभरण उपाययोजनांची देखभाल दुरुस्ती
५- नैसर्गिक शेती आणि हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञानाचा परिचय
६- भूजल पातळी व पर्जन्यमापक संयंत्राचा परिचय पिकपाणी व्यवस्थापनातील त्याचे महत्व आणि यशोगाथापाणी पुरवठा व स्वच्छता समिती आणि भूजल मित्र यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या