अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

प्रतिनिधी -जिल्ह्याची अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे आपल्या ९०व्या व्यवसाय प्रारंभ दिनाचे औचित्य साधून सातारा विभागीय कार्यालयाने पाचवड येथील बचत गटांसाठीचा महा-कर्ज मेळावा बँकेचे कृषी व आर्थिक समावेशन उप – महाव्यवस्थापक श्री.राजेश देशमुख व जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री विश्वास सिद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने यावेळी ३०० हून अधिक बचत गटांना जवळपास रु २०.०० कोटी रुपयांचे कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. सामजिक दायित्व म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल कार्यालयामार्फत ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांना बचत गटासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमासाठी देणगी धनादेश सुपूर्द केला गेला.  

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.देशमुख म्हणाले बँकेने महिला बचतगट करिता केंद्रीय स्तरावर खास स्वयं-सहायता गटांचे स्वतंत्र वर्टिकल कक्ष स्थापन केला आहे. याद्वारे बचत गट यांचे लिंकेज वाढविण्यासाठी अनेक योजना बँक राबवत असून ग्रामीण महिला व बालविकास ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे सेवा देत आहोत . बचत-गट सदस्यांना सरकारने राबविलेल्या वैयक्तिक कर्ज, जनधन खाते, सामाजिक सुरक्षा विमा व बिसी सखी योजनेमध्ये सामील होण्याचे आवाहन श्री.देशमुख यांनी केले.

 श्री. विश्वास सिद यांनी महा- कर्ज मेळावा आयोजित करून महिला सक्षमीकरणासाठी बँकेने दिलेल्या योगदानाबाबत बँकेचे विशेष अभिनंदन केले. मार्गदर्शन करताना श्री. सिद म्हणाले की, बचतगट योजने प्रमाणे महिलांनी कृषी पूरक व लघु-व्यवसायाकडे वळावे व विविध शासकीय व बँक योजनांचा लाभ घेवून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणं सबलीकरण व्हावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आपल्या प्रास्तविक भाषणामध्ये बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. सौरभ सिंग यांनी डिजिटल व्यवहार, ग्रामीण क्रेडिट स्कोअर सामाजिक सुरक्षा विमा योजनांचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. सर्व महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून आर्थिक क्षमता बळकट करावी व कर्जांची परतफेड नियमित व चांगली ठेवावी असे आवाहन केले. बँकेच्या ९०व्यां व्यवसाय प्रारंभ दिनाच्य शुभेच्छा देत, महिला सबलीकरणासाठी बँक सदैव पाठीशी असल्याचे प्रतिपादन श्री.सिंग यांनी केले. 

या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना श्री. अंकुश मोटे जिल्हा अभियान व्यवस्थापक डीआरडीए सातारा यांनी आपली परतफेड चांगली ठेवल्यास बचतगट योजनेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला व बँकांनी वैयक्तिक कर्ज वाटप करण्यासाठी अधिक भर द्यावा असे आवाहन केले. या आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्र ने एकूण २०४४ बचत गटांना रक्कम रुपये ६४ कोटी कर्ज वितरित केले आहे.   

या प्रसंगी लाभार्थी महिला बचत गट प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले व आयोजकांचे आभार मानले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीराज साबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रंजनकुमार वायदंडे,जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेश डीआरडीए, सर्व बीएमएम, CRP व बँक सखी DRDA यंत्रणा, अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. तळपे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चे सर्व शाखाधिकारी व इतर स्टाफ यांनी जी मेहनत घेतली त्यांचे आभार श्री. सागर मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केल्याने उपस्थीत महिला प्रतिनिधी व बचत गट पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket