म्हसवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडाकेबाज संयुक्त कारवाई “
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील वरकुटे मलवडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत सोलर पॅनल लगत असलेली स्ट्रिंग केबल वायर व इतर वायर आवाडा सोलर प्राव्हेट लि. कंपनीची केबल २,५८,०००/- रुपये किंमतीचे केबल वायर कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केलेबाबत आवाडा सोलर पावर प्रा. लि. कंपनीचे सुपरवायझर यांनी दिले तक्रारी वरुन म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २८४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २७८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यांचा तपास सुरू होता परंतु आरोपीचा शोध घेतला असता अज्ञात आरोपीचा थांगपत्ता लागत नव्हता.
म्हसवड पोलीसांनी मा. पोलीस अधीक्षक, सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक, सातारा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, दहिवडी यांनी श्री. विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, सातारा व संदीप पोमण, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, म्हसवड यांना सोलर पॅनल परीसरात होणारे गंभीर चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. व त्यानुसार पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके व सहा. पोलीस निरीक्षक, संदीप पोमण गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून म्हसवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी संयुक्त एक विशेष पथक स्थापन केले होते व त्यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
सदरचे पथकाने सोलर पॅनलचे केबल वायर चोरी करणारे अज्ञात इसमांचा गोपनिय बातमीदार व तांत्रिक माहीतीचे आधारे शोध घेवुन १) आर्दश दत्तात्रय आटपाडकर, रा. पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर व २) अजय भिमराव पवार, रा. सांजा ता. जि. धाराशिव यांना सोलापुर व धाराशिव येथुन ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणुन कसून चौकशी केली असता आरोपी यांनी संगनमताने चोरलेले केबल वायर असल्याचे उघड झाले. आरोपी याने चोरी केलेले २,५८,०००/- रुपये किंमतीचा केबल वायर काढून दिल्या असुन त्या गुन्ह्यांचे तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीम. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, व श्री. रणजित सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विश्वजित घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक, अमित शिंदे व अमंलदार अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, प्रकाश इंदलकर, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, संतोष काळे, सतिष जाधव व स्थानिक गुन्हे शाखा सातारा चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात पुजारे, अंमलदार सचिन सांळुखे, सनी आयटे, अमित सपकाळ, ओंमकार यादव, मोहन पवार व संजय जाधव यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.



