खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर आधुनिक विज्ञानयुगाला सामोरे जाण्याची ताकद, रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया- खासदार शरदचंद्रजी पवार यशोदा टेक्निकल कॅम्पस तर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७/१२ उताऱ्यावरील ‘पोटखराब’ क्षेत्र होणार नियमित किकली मधील संचिता चे राष्ट्रीय धनुरविद्या स्पर्धेत दमदार यश. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन
Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी ५४% मतदान!

महाबळेश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी ५४% मतदान!

महाबळेश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी ५४% मतदान!

महाबळेश्वर (राजेंद्र सोंडकर) : महाबळेश्वर शहरातील प्रतिष्ठित अर्बन बँकेच्या १३ संचालकांसाठी २७ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. एकूण ६१६० मतदारांपैकी ३३२९ मतदारांनी मतदान केले, ज्यामुळे ५४% मतदानाची नोंद झाली.

मतदान दोन केंद्रांवर पार पडले आणि यासाठी १२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

निवडणुकीत सर्वसाधारण आठ जागांसाठी १५ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी ०४ उमेदवार, इतर मागासवर्गीय एक जागेसाठी ०२ उमेदवार, अनुसुचित जाती जमाती एका जागेसाठी ४ उमेदवार तर भटक्या विमुक्त एक जागेसाठी ०२ उमेदवार रिंगणात आहेत.

मतमोजणी उद्या सोमवार रोजी शाळा क्र ३ मध्ये होणार असून मतमोजणीसाठी ७३ कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल.

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ अनुराधा पंडीतराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष पवार तसेच चतुर साहेब व सुहास आमराळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर

Post Views: 10 खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर वाई जिमखाना वाई या

Live Cricket