अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा टेक्निकल कॅम्पस तर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

यशोदा टेक्निकल कॅम्पस तर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

यशोदा टेक्निकल कॅम्पस तर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

उद्योग तज्ञांशी साधता येईल थेट संवाद, विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा यांच्या वतीने एसएससी (दहावी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन उद्या दिनांक 10 मे रोजी करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या पुढील शिक्षण आणि व्यावसायिक आयुष्यासाठी स्पष्ट दिशा मिळावी, या उद्देशाने घेतला जात आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शाखांमधील तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, व्यावसायिक अभ्यासक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 

त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजना, शिष्यवृत्ती याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात येईल. या कार्यक्रमात उद्योगजगतातील मान्यवर तज्ज्ञ उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय आणि नोकरीच्या संधी, आवश्यक कौशल्ये, उद्योगातील गरजा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 

या संवादामुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील वास्तव समजण्यास मदत होणार आहे. करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पालकांसाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात पालकांनी आपल्या पाल्याच्या करिअर निर्णयामध्ये कशी सकारात्मक भूमिका घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखता येत नाहीत, आणि योग्य माहितीच्या अभावामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. यामुळे नंतर शिक्षणाची दिशा बदलावी लागते, वेळ व पैसा वाया जातो. अशा वेळी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःला ओळखण्याची, शंका दूर करण्याची आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याची संधी मिळते. यशोदा टेक्निकल कॅम्पसने समाजप्रबोधनाच्या उद्देशाने हा कार्यक्रम विनामूल्य आयोजित केला आहे.यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षणक्षेत्र निवडले पाहिजे, जे त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आमचा उद्देश केवळ शिक्षणपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनवणे हाच आमचा हेतू आहे.” विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket