Home » राज्य » शिक्षण » खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर

खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर

खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अविस्मरणीय ठरले वाई जिमखाना वाई चे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर

वाई जिमखाना वाई या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोप खेळाडूंच्या चित्तथरारक व आकर्षक अश्या खेळांच्या सादरीकरणाने संपन्न झाला. दिनांक २० एप्रिल २०२५ पासून सुरु असलेल्या या शिबिरात १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या शिबिरात प्रशिक्षकांद्वारे योगा, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, रोप मल्लखांब, एरीयल सिल्क अश्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच खेळाडूंमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्यामध्ये मुलांनी गायन-नृत्य-लाठीकाठी-वक्तृत्व अश्या विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी फनी गेम्स चे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये पालकांनी अतिशय हिरीरीने सहभाग घेतला व खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडू व पालकांना सांगता समारोप प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच सन २०२४ – २०२५ दरम्यान राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पालकांनी खेळाडूंना केवळ शिबिरा पुरते सहभागी न ठेवता वर्षभर नियमित पाठवावे असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा श्री मदन दादा भोसले यांनी या प्रसंगी केले. तसेच नुकतेच वाई जिमखाना वाई व किसनवीर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेले बॅडमिनटन कोर्ट मुळे अनेक खेळाडू सरावासाठी येत असून किसनवीर महाविद्यालयाने ज्या उद्देशाने हा स्पोर्ट्स HALL बांधला होता तो उद्देश सफल होत असल्याचे समाधान देखील याप्रसंगी व्यक्त केले. 

या समारोप प्रसंगी संस्थेच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी महाकाल व छ संभाजी महाराज या थीम वर आधारित सादर केलेले प्रात्याक्षिके अविस्मरणीय ठरली. या सादरीकरणामध्ये मशाल मल्लखांब, तलवार व लाठी काठी करत केलेला मल्लखांब व निराधार मल्लखांबाचे केलेले सादरीकरण हे विशेष उल्लेखनीय ठरले. वाई जिमखान्याचे अध्यक्ष श्री अमर कोल्हापुरे यांनी या सर्व मुलांनी सादारीकरणासाठी घेतलेल्या कष्टाचे व दाखवलेल्या साहसाचे विशेष कौतुक केले. शिबिरामध्ये श्री प्रसाद बेडेकर, कु निर्मल चौधरी, कु पल्लवी शिंदे, कु नेहा क्षीरसागर, कु प्रणाली जगताप, कु अनिता मांढरे, कु श्रावणी उंबरकर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले. तसेच वाई जिमखान्या अंतर्गत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे हे २५ वे वर्ष असल्याने यावर्षी वाई जिमखान्याचे माजी संचालक, माजी प्रशिक्षक व माजी खेळाडू यांचा देखील सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रशिक्षक श्री विठ्ठल गोळे, मान्यावर श्री इंगवले बापू, श्री मोहन आबा भोसले, वाई जिमखाना उपाध्यक्ष श्री रमेश यादव, संचालक श्री वैभव फुले, श्री अमीर बागुल, श्री शैलेंद्र गोखले, सौ प्रीती कोल्हापुरे, उत्कर्ष पतसंस्था अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, संचालक श्री मदन साळवेकर, वाई जिमखाना माजी संचालक श्री अफजल पठाण, श्री दिनकर बापू शिंदे व श्री विजय रसाळ हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन

Post Views: 117 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन पाचगणी – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Live Cricket