महाबळेश्वर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी ५४% मतदान!
महाबळेश्वर (राजेंद्र सोंडकर) : महाबळेश्वर शहरातील प्रतिष्ठित अर्बन बँकेच्या १३ संचालकांसाठी २७ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. एकूण ६१६० मतदारांपैकी ३३२९ मतदारांनी मतदान केले, ज्यामुळे ५४% मतदानाची नोंद झाली.
मतदान दोन केंद्रांवर पार पडले आणि यासाठी १२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
निवडणुकीत सर्वसाधारण आठ जागांसाठी १५ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी ०४ उमेदवार, इतर मागासवर्गीय एक जागेसाठी ०२ उमेदवार, अनुसुचित जाती जमाती एका जागेसाठी ४ उमेदवार तर भटक्या विमुक्त एक जागेसाठी ०२ उमेदवार रिंगणात आहेत.
मतमोजणी उद्या सोमवार रोजी शाळा क्र ३ मध्ये होणार असून मतमोजणीसाठी ७३ कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ अनुराधा पंडीतराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष पवार तसेच चतुर साहेब व सुहास आमराळे यांनी परिश्रम घेतले.
