पाचगणी च्या पाणी प्रश्नासाठी ५२ कोटी मंजूर-आ.मकरंद पाटील.
पाचगणी येथील पर्यटन क्षेत्रासाठी विशेष प्रयत्न करणार.
सातारा.दि.पाचगणी शहर हे शिक्षणासाठी जसे महत्त्वाचे आहे तसेच ते पर्यटनासाठी महत्त्वाचे आहे.पण इथे शुद्ध पाणी मिळत नाही अश्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत.म्हणूनच पाचगणी पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ५२ कोटी रुपयांची योजना मजूर करून घेतली असल्याचे प्रतिपादन आ.मकरंद पाटील यांनी केले.
पाचगणी ता.महाबळेश्वर येथील जाहीर सभेत आ.मकरंद पाटील बोलत होते.
या प्रसंगी आ.मकरंद पाटील म्हणाले आज पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही मला चढत्या क्रमाने विजय दिलाय.महाबळेश्वर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका आहे.निसर्गाने महाबळेश्वर तालुक्याला भरभरून दिलंय.पाचगणी महाबळेश्वर ला २५ ते ३० लाख पर्यटक प्रत्त्येक वर्षी भेट देत असतात.त्यामुळेच इथल्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे.प्रतापगड च्या विकासासाठी १२१ कोटी,क्षेत्र महाबळेश्वर १८१ कोटी,तापोळा परिसर १०० कोटींची विकासकामे मी मंजूर केली आहेत.६५ वर्षात कोयनेच्या बॅक वॉटर वर एकही पूल झाला नाही पण मी आमदार होताच २८ कोटी खर्च करून मी पूल बांधला.आणि आता १७५ कोटी रुपये किमतीचा भव्य पुलाच्या बांधकामाचे काम चालू आहे..त्या पुलावर कॅप्सूल लिफ्ट करतोय.कांदाट खोऱ्यात पर्यटन कसं वाढेल यासाठी मी प्रयत्नशील आहे.वेण्णा लेकच्या परिसराचा सुधारित आराखडा तयार केला आहे.
पाचगणी साठी टेबल लँड चा सुधारित आराखडा तयार आहे.भीम नगर मध्ये सांस्कृतिक भवन उभ केल आहे.सिद्धार्थ नगर मध्ये एक कोटी २७ लाख मंजूर केले आहेत. पाचगणी,महाबळेश्वर मधील पारसी पॉइंट आणि सिडनी पॉइंटसाठी २५ कोटी मंजूर केले असून बचत गटांसाठी सुंदर इमारत बांधणार आहे.पाचगणी मध्ये येणाऱ्या पर्यटकांचा वेळ वाचण्यासाठी फास्ट ट्रॅक सुविधा सुध्दा मंजूर करून घेतली आहे.पाचगणीचा सर्वात महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा राहिलाय.मी याच प्रश्ना संधर्भात निवडणुकी पूर्वी आराखडा तयार केलाय.तब्बल ५२ कोटी रुपये या योजनेला खर्च आहे.निवडणूक होताच पाहिलं काम पाचगणीच्या पाण्याची योजना असेल हा माझा शब्द आहे.
माजी नगराध्यक्ष शेखरदादा कासूर्ड म्हणाले की पाचगणी मध्ये तब्बल ५० कोटींची कामे आबांनी केली आहेत.संपर्क आणि विकासाच्या बाबतीत आबांची बरोबरी कोणी करू शकत नाही.५२ कोटींची पाण्याची योजना आबा मंजूर करणार आहेत.आबांच्याकडे कोणीही जावा आबा कधीच कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत.आबा,आमच्यावर तुमच्या माध्यमातून संस्कार झालेले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे शेखर भिलारे म्हणाले की भारतीय जनता पार्टी जी महाबळेश्र्वर तालुक्यात आ.मकरंद पाटील यांच्या विजयासाठी खांद्याला खांदा लाऊन प्रचार करतेय. विजयासाठी आम्ही सर्व काही करू.
पाचगणीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासूर्डे म्हणाले की आबा तुम्ही विकासपुरुष आहात.पाचगणी साठी खूप महत्त्वाची कामे आबांनी केली आहेत.पार्किंगची अडचण दूर करावी,वाहनतळ उभराव यासाठी आ.मकरंद पाटील हे पुढील ३ महिन्यात निधी उपलब्ध करून देतील.आबांनी आपल्याला भरपूर दिलंय.आता आपल्याला आबांना फक्त एक मत द्यायचं आहे.
राजू शेठ राजपुरे म्हणाले की पाचगणी च्या शहरांमधे इतिहासातील येवढी भव्य रॅली आणि सभा होते याचे शिल्पकार मकरंद आबा आहेत.
कोरोना काळात माणसांना आणि जनावरांना जगवण्याच काम आबांनी केलंय.पाचगणी शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी धोम धरणाचं पाणी इथ आणायचं आहे.आपल्या सुख दुःखात उभ राहणारे आबाच आपल्याला जपणार आहेत.पाचगणी हे शैक्षणिक हब आहे त्याच बरोबर पर्यटन हब आहे.म्हणूनच पाचगणी साठी शैक्षणिक आणि पर्यटना साठी विकास आराखडा बनऊन पाचगणी शहर देशात अग्रेसर बनविणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाहिलं korona सेंटर आबांच्या माध्यमातून पाचगणी मधून सुरू झाल.आबा आपल्यासाठी तब्बल ३६५ दिवस अहोरात्र झटत होते.आता आपली वेळ आहे.आबांच्या प्रेमाची,विकास कामांची,कष्टाची उतराई म्हणूनआपण आबांना मत द्यायचं आहे.ही निवडणूक लाडक्या बहिणींनी,युवकांनी हातात घेतली आहे.त्यामुळेच आता जिंकून आल्यावर आबा मंत्री होणार आणि मकरंद आबांचा यापेक्षा मोठा सत्कार पाचगणी मध्येच होणार.या निवडणुकीत आपल्या मतदार संघातील सर्वच महिला आबांच्या पाठीशी आहेत.म्हणूनच आबांचा विजय पक्का आहे.
पाचगणी शहरामध्ये पार्किंग ची भव्य आणि सुसज्य इमारत उभारणार असून सुरुर ते कुंभरोशी पर्यंत १७५ कोटीचा रस्ता मी मंजूर केलाय.महाबळेश्वर तालुक्याला पर्यटना शिवाय दुसरा पर्याय नाही.२५ लाख पर्यटनाचा आकडा १ कोटी पर्यन्त घेऊन जाण्याचा उद्देश आहे.
येवढ्या मोठ्या ऐतिहासिक सभेमध्ये तुम्ही सर्वांनी उपस्थित दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार.
पाचगणी शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि रेकॉर्डब्रेक सभा म्हणून नोंद झालेल्या या सभेला सुध्दा महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.शेकडो महिला आणि हजारो कार्यकर्त्यांनी मकरंद आबांच्या विजयाच्या घोषणा देत पाचगणी शहर परिसर दुमदुमून सोडला.