Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा- जावलीतील ३२ विकासकामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

सातारा- जावलीतील ३२ विकासकामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

सातारा- जावलीतील ३२ विकासकामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून मिळवला निधी

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा- जावली मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करून सातत्याने कोट्यवधींच्या निधीची बरसात करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन सातारा व जावली तालुक्यातील ३२ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून हा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित आभार मानले आहेत. 

           मंजूर निधीतून सातारा तालुक्यातील कारी येथील मातंग वस्ती अंतर्गत रस्ता करणे २५ लाख, कोंडवे मातंग वस्ती अण्णाभाऊ साठे समाजमंदिराकडे जाणारा रस्ता करणे ३० लाख, वेचले गोसावी वस्ती अप्रोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १५ लाख, डोळेगाव गोसावी वस्ती अप्रोच रस्ता खडीकरण दंबरीकरण १५ लाख, कारी बेले वस्ती रिटेनिंग वॉल व रस्ता कोंक्रीटीकरण २५ लाख, बोरगाव डौरी समाज अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १५ लाख, कळंबे सिद्धार्थनगर व गणेश नगर संरक्षक भिंत बांधणे १० लाख, कळंबे मातंग व नवबौद्ध वस्ती स्मशानभूमी सुधारणा करणे १० लाख, धावडशी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, किडगाव सह्याद्रीनगर वस्ती २ मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, पानमळेवाडी येथे नवनाथ नगर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, आकले येथे गोसावी समाजाकरिता समाजमंदिर बांधणे १५ लाख मंजूर झाले आहेत.  

        आकले गोसावी वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, आकले कातकरी वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख रुपये, वर्ये समतानगर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, नागेवाडी बौद्धवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, नेले बौद्धवस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, कळंबे नवबौद्ध वस्ती येथे समाजमंदिर बंधने १५ लाख, नागेवाडी नवबौद्ध वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, लिंब गोसावी वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, लिंब मातंग वस्ती रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, कळंबे रामोशी वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख आणि परळी शाहूनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जावली तालुक्यातील मेढा गांधीनगर प्राथमिक शाळेजवळ सामाजिक सभागृह ३० लाख, सरताळे गोसावी वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, सायगाव दलित वस्ती व गोसावी वस्ती जाणारा रस्ता खडीकरण दंबरीकरण २० लाख, सोनगाव गोसावी वस्ती अप्रोच रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, कुडाळ इंदिरानगर रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख, बेलोशी मागासवर्गीय वस्तीतील सभामंड्प परिसर सुधारणा करणे १० लाख, रायगाव मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे २५ लाख, मार्ली भैरवनाथ मंदिर ते दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, तेटली बौद्धवस्ती समाजमंदिर बांधणे १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार त्वरित पूर्ण करून मंजूर कामे तातडीने सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket