4 एप्रिल 2025 आजचे राशिभविष्य
आजचा दिवस शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल सप्तमी, शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – आर्द्रा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३१ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५२ मि.
मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. आपले मनोबल आज उत्तम असणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना आज अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृषभ : आर्थिक कामांकरिता आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्यावर असणारा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गेले गों दिवस असणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.
कर्क : मानसिक दुर्बलता जाणवेल. काहींना नैराश्य जाणवेल. आज आपल्यापैकी काही जणांचा आराम करण्याकडे कल राहील. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. प्रवास नकोत.
सिंह : दैनंदिन कामे होतील. तुमचे बौद्धिक अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या : आनंदी रहाल. आज आपण विशेष मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आपले तेच खरे कराल. काहींना आपल्या कार्यक्षेत्रात विशेष सुसंधी लाभेल. मनोबल वाढणार आहे.
तुला : काल जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. आपल्याला मानसिक स्वास्थ्य देणारी एखादी घटना घडेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे आज आपण मार्गी लावू शकणार आहात.
वृश्चिक : आज आपले मन नाराज राहण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्त रहाल. आज आपले मन आपण शांत व संयमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. आजची आपली सर्व कामे आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. मनोबल वाढेल. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
मकर : मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होणार आहेत.
कुंभ : प्रियजन भेटणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अनपेक्षित धनलाभ होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.
मीन : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. वैचारिक प्रगती होईल. नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
