Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » २४ वा ग्रंथ महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे निकाल जाहीर

२४ वा ग्रंथ महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे निकाल जाहीर

२४ वा ग्रंथ महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे निकाल जाहीर

           सातारा( प्रतिनिधी ):- सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या २४ वा ग्रंथमहोत्सव कार्यक्रम तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरी, जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे सुरू असून आज झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा स्पर्धेचा निकाल संयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 

            या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक विभागांमध्ये एकूण बारा शाळा सहभागी झाल्या होत्या. माध्यमिक विद्यालय विभाग यामध्ये दहा शाळा सहभागी झाल्या होत्या. ज्युनियर विभाग मध्ये तीन कॉलेज सहभागी झाली होती. विशेष विभागात दोन विद्यालये सहभागी झाली होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-

 प्राथमिक विभाग

 नवीन मराठी शाळा ( आसामी गीत ) प्रथम क्रमांक 

 आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर ( पोतराज लोककला नृत्य ) द्वितीय क्रमांक 

 साधना इंग्लिश मीडियम स्कूल ( वाघ्या मुरळी) द्वितीय क्रमांक 

 लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर एमआयडीसी, कोडोली ( राधे तू हळूहळू चाल ) तृतीय क्रमांक

 जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल ( धनगर गीत) तृतीय क्रमांक

 आदर्श विद्या मंदिर करंजे पेठ ( धनगरी गीत) उत्तेजनार्थ 

 स्फूर्ती विद्यामंदिर ( तू कधी होणार माणूस ) उत्तेजनार्थ 

 माध्यमिक विभाग

 सुशीला देवी साळुंखे हायस्कूल ( मम्मी पप्पा नाही म्हणायचं ) प्रथम क्रमांक 

 सराहलिना स्कूल ( देवीचा जोगवा ) द्वितीय क्रमांक 

 न्यू इंग्लिश स्कूल सातारा ( मागु कसा मी ) तृतीय क्रमांक 

 यशोदा पब्लिक स्कूल ( भरत नाट्यम ) उत्तेजनार्थ 

 उच्च माध्यमिक ज्युनिअर विभाग 

 क्रांतीस्मृती अध्यापक विद्यालय ( सण पाडव्याचा) प्रथम क्रमांक

 महात्मा फुले अध्यापक विद्यालय ( द्रोपदी वस्त्रहरण ) द्वितीय क्रमांक 

 कन्या शाळा जुनिअर कॉलेज ( वारकरी नृत्य ) तृतीय क्रमांक

 विशेष शाळा विभाग 

 मूकबधिर मुलांचे विद्यालय, मल्हार पेठ ( आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला ) प्रथम क्रमांक

 आशा भवन मतिमंद मुलांचे बालगृह ( शिवबा आमचा मल्हारी ) प्रथम क्रमांक

            बक्षीस वितरण समारंभ सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक डॉ. समीर शेख यांची असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष प्राचार्य वि.ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, मुख्य समन्वयक आर.पी. निकम व सर्व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 122 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket