Home » राज्य » संतोष शिंदे यांची चांदवडी गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

संतोष शिंदे यांची चांदवडी गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

संतोष शिंदे यांची चांदवडी गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

वाई (संजीव वरे )-चांदवडी ता.वाई येथील श्री . संतोष जनार्दन शिंदे यांची ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री .श्री. मकरंदआबा पाटील आणि सातारा जिल्ह्याचे खासदार श्री. नितीनकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आलेल्या गावांमधील विकासकामांच्या मागण्यांची सविस्तर माहिती व चर्चा करण्यात आली सरपंच फरीदा अहमदशेख, सौ. रेखा संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अमोल शिंदे, श्रीमती यमुना सर्जेराव काकडे, गुलाबराव पांडुरंग शिंदे (माजी उपसरपंच).: ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रकाश पाटलू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत सखाराम शिंदे (माजी ग्रामपंचायत सदस्य) सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मोरे, संतोष आनंदराव शिंदे, राजेंद्र किसन शिंदे, रफिक चाचा शेख, रमेश शंकर शिंदे, अशोक अण्णा काकडे, अनिल भाऊ जाधव. नंदू पोळ,सुधाकर जी काकडे अरविंद दादा काकडे आधी बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ हजर होते.

गावची विकास कामे सार्वजनिक पाण्याची विहीर मंजूर करणे गाव मोजणी करून गावठाण हद्द कायम करणे. अंतर्गत रस्ते आणि बंदिस्त गटर पाईपलाईन तयार करणे.याबाबत मंत्री महोदयांनी व खासदारांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सार्वजनिक विहीर, रस्ते आणि गाव मोजणीचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket