Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » संजीवन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची भारतीय लष्करात अधिकारी म्हणून निवड

संजीवन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची भारतीय लष्करात अधिकारी म्हणून निवड

संजीवन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची भारतीय लष्करात अधिकारी म्हणून निवड

अनन्या मेरी सेबॅस्टियन हिची NCC Special Entry मधून शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी निवड

पाचगणी : संजीवन विद्यालय, पाचगणीची 2023 सालची माजी विद्यार्थिनी अनन्या मेरी सेबॅस्टियन हिची भारतीय लष्कराच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (NCC Special) – महिला, 124 वा अभ्यासक्रम यासाठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संजीवन विद्यालयासह तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अनन्याला 24 सप्टेंबर 2026 रोजी अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA), चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. NCC Special Entry अंतर्गत तिची निवड झाली असून, शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत ती भारतीय लष्करात अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेणार आहे.

अनन्याच्या या यशाबद्दल संजीवन विद्यालयाच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाने तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, “संजीवन विद्यालयाला आपल्या माजी विद्यार्थिनी अनन्या मेरी सेबॅस्टियन हिचा मनापासून अभिमान आहे,” अशी भावना व्यक्त केली.

“संजीवनमध्ये शिकली… आज राष्ट्रसेवेच्या मार्गावर!” या शब्दांत विद्यालयाने अनन्याच्या यशाचे कौतुक केले आहे.

अनन्याचा शिस्त, नेतृत्व, सेवा आणि राष्ट्राभिमानाच्या मूल्यांवर आधारित हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. संजीवन विद्यालयात घेतलेल्या शिक्षणातून राष्ट्रसेवेच्या दिशेने झालेली तिची वाटचाल ही विद्यालयाच्या शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित संस्कारांचे उदाहरण असल्याचे विद्यालयाने नमूद केले.

“संजीवनमधील शिक्षणातून राष्ट्रसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.”संजीवन विद्यालय, पाचगणी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व घडविण्याचा संकल्प.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket