Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » संगम माहुली येथे निर्माल्य संकलनातून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सवा’चा संदेश

संगम माहुली येथे निर्माल्य संकलनातून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सवा’चा संदेश

संगम माहुली येथे निर्माल्य संकलनातून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सवा’चा संदेश

सातारा -यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणपती विसर्जनाच्या निमित्ताने संगम माहुली येथे निर्माल्य संकलन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व समिती सदस्य यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेशमूर्ती विसर्जनानंतर नदीपात्र व परिसरातील निर्माल्य तसेच इतर कचरा संकलित केला. संकलित निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी स्वयंसेवकांनी नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच जलप्रदूषण रोखणे याबाबत जनजागृती केली. ‘निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कलशात द्या’ तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. डी. नामदार, डॉ. जय चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. अवधूत कदम, श्री. सुनील सूर्यवंशी व श्री. स्मितेश नलगे यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket