Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाईच्या दुष्काळी संकटावर ॲड.निलेश डेरे आक्रमक; शरद पवारांची भेट, प्रशासनाला निवेदन देणार

वाईच्या दुष्काळी संकटावर ॲड.निलेश डेरे आक्रमक; शरद पवारांची भेट, प्रशासनाला निवेदन देणार

वाईच्या दुष्काळी संकटावर ॲड.निलेश डेरे आक्रमक; शरद पवारांची भेट, प्रशासनाला निवेदन देणार

वाई प्रतिनिधी -वाई तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी ॲड. निलेश लक्ष्मणराव डेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवारसाहेब यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. 

वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्त भागासाठीच्या सर्व सवलती व शासकीय मदत तातडीने लागू करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे स्पष्ट केले.

वाई तालुक्यातील सद्यस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी, शेतमजुरांची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम याबाबत ॲड.डेरे यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ पाहणी न करता तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला लवकरच निवेदन देणार असून, या प्रश्नाचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. डेरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पदवीधर मतदार नोंदणी तसेच आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही शरद पवार यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा झाली.शेतकरी आणि वाई तालुक्याच्या हक्कांसाठी प्रशासनाच्या दरवाजापासून शासनस्तरापर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार ॲड. डेरे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket