जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Home » ठळक बातम्या » रामलिंग वन्यजीव अभयारण्य विकसित करून पर्यटनाला चालना द्यावी – वनमंत्री गणेश नाईक

रामलिंग वन्यजीव अभयारण्य विकसित करून पर्यटनाला चालना द्यावी – वनमंत्री गणेश नाईक

रामलिंग वन्यजीव अभयारण्य विकसित करून पर्यटनाला चालना द्यावी – वनमंत्री गणेश नाईक

तुळजापूर वनपरिक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिमा उभारण्याचे निर्देश

मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील येडशी, भानसगाव तसेच कळंब तालुक्यातील रामलिंग वन्यजीव अभयारण्य विकसित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रात आयुर्वेदिक आणि देशी वृक्षांच्या लागवडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिमा उभारावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिक प्रतिमा उभारणी, येडशी येथील रामलिंग वन्यजीव अभयारण्याचा विकास आणि तुळजापूर येथील प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री श्री. नाईक बोलत होते. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत येडशी येथील वन्यजीव अभयारण्य, रामलिंग देवस्थान आणि परिसराला दरवर्षी मोठ्या संख्येने निसर्ग पर्यटक भेट देतात. या पर्यटकांमध्ये निसर्ग शिक्षणाचा प्रसार करण्याबरोबरच निसर्ग पर्यटनाचा विकास व व्यवस्थापन, निसर्ग पाऊलवाटांची निर्मिती आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी.

तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य नैसर्गिक प्रतिमा साकारण्यासाठी तसेच प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीसाठी वन विभागाने सकारात्मक आणि गतीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket