Home » राज्य » शिक्षण » भिलारच्या चैताली भिलारेची आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेत चमक मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड; पुणे विद्यार्थी गृहाच्या १८ विद्यार्थ्यांचे यश

भिलारच्या चैताली भिलारेची आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेत चमक  मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड; पुणे विद्यार्थी गृहाच्या १८ विद्यार्थ्यांचे यश

भिलारच्या चैताली भिलारेची आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेत चमक  मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड; पुणे विद्यार्थी गृहाच्या १८ विद्यार्थ्यांचे यश

पांचगणी (प्रतिनिधी )-चिन्मय मिशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेच्या मुंबई विभाग पूर्व फेरीत पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध स्तरांतील १८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत पारितोषिके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.भांडुप येथील व्यावसायिक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत गेनू भिलारे यांची नात चैताली गणेश भिलारे हिनेही उल्लेखनीय यश मिळविले असून तिची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत शौर्यानी प्रशांत माने, ओवी विशाल पवार, महेश कृष्णचंद्र गिरी, श्लोक अविनाश कुलकर्णी, शुभ्रा सुभाष झनकर, तनुष देवेंद्र पाटील, अभिराज राजेश पानसरे, प्रिन्स प्रसन्नकुमार कांबळे, स्वरा जितेंद्र फोफाळे, वर्निका मिलिंद कदम, श्रेया तात्यासो कलांगे, चैताली गणेश भिलारे, अस्मी अमित कांबळे, प्रणाली प्रसन्नकुमार कांबळे आणि स्वाती ज्योती मिश्रा यांनी यश संपादन केले. तसेच उत्तेजनार्थ श्रिया सुरज धांद्रूत आणि प्राची लहू भोसले यांनी यश मिळविले. 

शिक्षक गटातून शिक्षिका पौर्णिमा अभिजीत कोकरे यांनीही पारितोषिक मिळवले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर शौर्यानी प्रशांत माने, चैताली गणेश भिलारे आणि तनुष देवेंद्र पाटील यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

चैतालीच्या या यशामुळे भिलार परिसरातून तिचे विशेष कौतुक होत आहे. श्लोक पठण, संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या या स्पर्धेत तिने मिळविलेले यश कौतुकास्पद मानले जात आहे.

तिच्या या यशामागे पालक, शिक्षक तसेच मार्गदर्शकांचे प्रोत्साहन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. चैतालीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत असून, मुंबई विभागीय स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षिका पौर्णिमा कोकरे यांचे पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले. पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket