Home » राज्य » शिक्षण » भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवारी मुंबईत संवाद साधणार

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवारी मुंबईत संवाद साधणार

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवारी मुंबईत संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवार, दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळ, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे पूर्व मुंबई येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय टास्क फोर्सकडे कोकण विभागासाठी konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील.

उच्चस्तरीय टास्क फोर्सने यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी पुणे, १६ सप्टेंबर रोजी नागपूर आणि १७ सप्टेंबर रोजी अमरावती आणि २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. या विभागांमधून प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार केला जाणार आहे.

तदनंतर दिनांक ३० सप्टेंबर रोजी नाशिक विभागात जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद आयोजित करण्यात आला आहे. नाशिक विभागासाठी nashik-examreformstaskforce @maharashtra.gov.in या ई-मेलवर अभिप्राय देता येईल.

विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket