Home » राज्य » शिक्षण » बळवंत पाडळे यांच्या नावासाठी भाजपमध्ये जोरदार आग्रह; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी दिले सकारात्मक विचाराचे आश्वासन

बळवंत पाडळे यांच्या नावासाठी भाजपमध्ये जोरदार आग्रह; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी दिले सकारात्मक विचाराचे आश्वासन

बळवंत पाडळे यांच्या नावासाठी भाजपमध्ये जोरदार आग्रह; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी दिले सकारात्मक विचाराचे आश्वासन

केळघर प्रतिनिधी :जावळी तालुक्यातील केळघर भागातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बळवंत पाडळे यांना संधी मिळावी असा जोरदार आग्रह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे भाजपच्या कार्यकर्त्या केला आहे.

आज सातारा येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यानी वरील मागणी केली आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत पक्षीय पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाडळे यांच्या स्वीकृत सदस्य पदाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

​या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तसेच पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे (जावली) अध्यक्ष भानूदास ओंबळे, तळोशीचे सरपंच सचिन बैलकर, बाहुळेचे सरपंच दत्तात्रय जाधव, पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे, मुकवलीचे सरपंच साहेबराव पवार आणि वाळंजवाडीचे उपसरपंच विलास पाडळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

​याशिवाय भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रदिप शेलार, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विकी दळवी, पश्चिम विभाग (जावली) मंडल चिटणीस अभिषेक दळवी, पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे प्रदिप बेलोशे, साहेबराव शेलार तसेच मुकवलीचे राजू पवार यांच्यासह परिसरातील इतर प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​केळघर भागातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बळवंत पाडळे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, असा सूर या वेळी उपस्थित मान्यवरांनी लावून धरला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबत सकारात्मक विचार करू असे यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket