गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार
Home » देश » धार्मिक » नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार

नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार

नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार

वाई : गणेशोत्सवाच्या काळात नदीपात्रात विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्ती, निर्माल्य तसेच त्यातील रासायनिक घटकांमुळे नदीचे प्रदूषण होऊ नये आणि नदीतील जलचर व सूक्ष्मजीवसृष्टीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या NCC युनिटच्या वतीने स्तुत्य पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

गणेशोत्सवानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती राहिल्यास नदीच्या पाण्याची गुणवत्ता बिघडण्याची शक्यता असते. विशेषतः काही मूर्तींमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील रासायनिक घटक पाण्यात मिसळल्यामुळे जलप्रदूषण होऊन नदीतील सूक्ष्मजीव, जलचर तसेच संपूर्ण जलपरिसंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाई NCC युनिटने नदीपात्रातील गणेशमूर्ती एकत्रित करून त्यांचे योग्य पद्धतीने संकलन केले आणि पुढील व्यवस्थापनासाठी त्या वाई नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या.

या उपक्रमामध्ये NCC कॅडेट्ससोबतच वाई शहरातील नदीकाठच्या परिसरातील लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. नदी आपलीच आहे आणि तिचे स्वच्छ व निर्मळ स्वरूप टिकविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. लहान मुलांनीही नदीपात्रातील मूर्ती संकलनाच्या कामात मदत केल्याने पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालवयातच निर्माण होण्यास हातभार लागला.

या उपक्रमासाठी पोलिस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप जाधव आणि किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे तसेच NCC अधिकारी मेजर डॉ. समीर पवार, सीनियर अंडर ऑफिसर तेजस शेलार यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी NCC कॅडेट्सच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी NCC कॅडेट्सच्या कार्याचे कौतुक करताना सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता समाज आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करणे हीच खरी सामाजिक जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य गुरुनाथ फगरे यांनीही विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, शिस्त, नेतृत्वगुण आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता निर्माण करण्यामध्ये NCC ची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

NCC अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने नदीपात्राची पाहणी करून तेथील गणेशमूर्ती एकत्रित केल्या आणि त्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या.गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नदीपात्रात राहणारे अवशेष आणि रासायनिक घटक नदीच्या पाण्यात मिसळल्यास त्याचा परिणाम केवळ पाण्यावरच नव्हे, तर नदीतील सूक्ष्मजीव, जलचर आणि संपूर्ण जैवविविधतेवर होऊ शकतो. त्यामुळे नदीपात्र स्वच्छ ठेवणे म्हणजे केवळ परिसराचे सौंदर्य जपणे नसून नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे होय, असा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

NCC कॅडेट्सनी केलेल्या या उपक्रमामुळे ‘नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे’ हा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. नदी स्वच्छ ठेवणे, नदीत कचरा किंवा मूर्ती न टाकणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे या उपक्रमाने अधोरेखित केले.

 NCC युनिटच्या या उपक्रमामुळे स्वच्छ नदी, निरोगी पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे इतर नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव”

Live Cricket