Home » राज्य » जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराडचे समीकरण निर्णायक; आ.अतुल भोसले-आ.मनोजदादा घोरपडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराडचे समीकरण निर्णायक; आ.अतुल भोसले-आ.मनोजदादा घोरपडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराडचे समीकरण निर्णायक; आ.अतुल भोसले-आ.मनोजदादा घोरपडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. २१ संचालक पदांसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार असून, महायुतीच्या माध्यमातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. जागावाटपाबाबत महायुतीतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कराड विभागातील सहकारी संस्थांचे राजकीय गणित आणि स्थानिक नेत्यांची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

विशेषतः उदयसिंह पाटील यांना अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांची साथ मिळाल्यास त्यांच्या उमेदवारीचे समीकरण अधिक मजबूत होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या तिघांमध्ये आगामी काळात कोणत्या प्रकारच्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे.

२१ जागांपैकी भाजपला ११, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मिळून १० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हे अंतिम जागावाटप नसून त्याबाबत चर्चा सुरू आहे. 

त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कराडसह जिल्ह्यातील भूमिका काय राहणार, उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीला कोणत्या नेत्यांचा पाठिंबा मिळणार आणि महायुतीच्या जागावाटपात कराडचे समीकरण कसे जुळणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आगामी काळातील बैठका, उमेदवारी अर्ज आणि जागावाटपानंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket