ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 

सातारा=दि. १६ सप्टेंबर २०२६: बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर्धापनदिनानिमित्त सातारा येथील बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या नूतन इमारतीमध्ये बँकेचे पोवई नाका शाखा कार्यालय व अंचल कार्यालय कार्यरत करण्यात आले आहे. यावेळी बँकेचे ग्राहक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपअंचल प्रबंधक श्री. अमर मोरे यांनी केले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील बँकेच्या कामगिरीचा तसेच बँकेने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. बँक ऑफ महाराष्ट्र ही केवळ बँकिंग सेवा देणारी संस्था नसून सातारा जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात सक्रिय योगदान देणारी संस्था आहे, असे त्यांनी नमूद केले.

नूतन कार्यालय व शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगली, जलद व गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न राहील. तसेच ग्राहक सेवा, डिजिटल बँकिंग, कर्जवितरण, शासकीय योजना आणि आर्थिक समावेशन या क्षेत्रांत अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर्धापनदिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांना शुभेच्छा दिल्या. बँकेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावीपणे बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. मोठ्या ग्राहकांना कर्ज उपलब्ध होत असताना गरीब, गरजू तसेच नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना वेळेवर कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

गरीब व गरजू नागरिक, नवउद्योजक, व्यावसायिक, शेतकरी तसेच लघु व मध्यम उद्योजकांना वेळेवर व आवश्यक ते आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी बँकांना केले. जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय व कृषी क्षेत्राला वेळेवर बँकिंग सेवा व वित्तपुरवठा उपलब्ध झाल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळून जिल्ह्याच्या आर्थिक विकासास हातभार लागेल, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.उपस्थित ग्राहकांनी आपले मनोगत व्यक्त केले व बँकेच्या ग्राहक सेवेबाबत समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बँकेचे अंचल प्रबंधक श्री. राहुल जोशी यांनी नूतन कार्यालयाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून बँकिंग सेवा अधिक गतिमान करण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित शाखाधिका-यांना स्थानिक पातळीवर खातेदारांच्या समस्या समजून घेवून त्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीराज साबळे यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. नितिन तळपे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket