महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगचा घवघवीत यशाचा शतकी टप्पा जीएनएम तृतीय वर्षाचा निकाल शंभर टक्के; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा- डॉ पी कुलकर्णी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! महाबळेश्वरच्या विकासकामांना गती; मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन
Home » Uncategorized » गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू

गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू

गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू

सातारा – सातारा जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अथडळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणेकरिता ढोल, ताशे इतर वाद्ये वाजवण्याचे विनियमन करुन नियंत्रण आणि ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे या करिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकारा नुसार दि. 29 सप्टेंबर 2026 पर्यंत कालावधीकरिता अधिकार प्रदान केले आहेत.

या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे अथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अश प्रकारे कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कटआऊटस्, जाहिराती उभारण्यासाठीही पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी 1951 चे कलम 36 अन्वये सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना योग्य त्या अटी व शर्तींवर संबंधितांना परवानगी देण्यास प्राधिकृत केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान तीन शैक्षणिक संस्थांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, पॉक्सो, बालविवाह, हुंडा प्रतिबंध व POSH

Live Cricket