गणेशोत्सवानिमित्त ‘सातारा न्यूज मीडिया सेव्हन’चा आरती संग्रह; नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते प्रकाशन
वाई : गणेशोत्सवानिमित्त सातारा न्यूज मीडिया सेव्हन डिजिटल अँड पब्लिकेशन्स यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आरती संग्रहाचे वाई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी वाईतील प्रसिद्ध बेस्ट वडापावचे मालक प्रदीप येवले, उद्योजक राहुल जायगुडे, पत्रकार अतुल संकपाळ यांच्यासह सातारा न्यूज मीडिया सेव्हनचे वाई प्रतिनिधी संजीव वरे उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना विविध आरत्या एकाच संग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘सातारा न्यूज मीडिया सेव्हन’च्या वतीने या आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.
यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




