सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » प्रशासकीय » सातारा जिल्ह्यात मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सातारा जिल्ह्यात मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सातारा जिल्ह्यात मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; १६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

सातारा दि.१२ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या सुधारित कार्यक्रमानुसार, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. नोटीस कालावधी आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रारूप मतदार याद्या उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर “सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ” (https://nic.satara.gov.in), “मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र” (https://ceoelection.maharashtra.gov.in) आणि “भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ” (https://eci.gov.in) येथेही मतदार यादी तपासता येईल.

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित मतदारांनी २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आपल्या मतदान केंद्राच्या BLO यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही आणि अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष पाटील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी केले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket