जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Home » राज्य » शिक्षण » जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत दिवाळी सणाचे औचित्य साधून आकाश कंदील बनवणे, कागदी फुले तयार करणे, दिवाळी भेटकार्ड बनवणे आदी विविध कलात्मक उपक्रमांची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कलाकौशल्य विकसित व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचा आनंद मिळावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, विविध सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक आकाश कंदील, सुंदर कागदी फुले आणि मनमोहक दिवाळी भेटकार्ड तयार केली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वतःच्या हातांनी विविध वस्तू तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलानिर्मितीचा आनंद मिळण्याबरोबरच स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, कल्पकता, सहकार्य आणि उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करण्याचे महत्त्वही समजले.

या कार्यशाळेस मुख्याध्यापिका छाया शिंदे, उपशिक्षक किरण यादव, दत्ता नाळे, अमोल घनवट आणि रेणुका कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती तयार करून आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.

शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाचा, कलात्मक दृष्टिकोनाचा आणि सर्जनशीलतेचा विकास घडवून आणण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात. या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण दिवाळीच्या आनंदाने आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने भारावून गेले.कृतीतून शिक्षण, कलात्मकतेतून सर्जनशीलता आणि कौशल्यातून स्वावलंबन’ हा संदेश देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket