येराडमध्ये ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर आज यात्रेच्या मुख्य दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल; शनिवारी दुसरा छबिना उत्साहात
कराड प्रतिनिधी –कोयनानगर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेतील पहिला छबिना शुक्रवारी ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. मानाच्या सासनकाठ्या व हजारो भाविक या छबिन्यात सहभागी झाले होते.
शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी १ वाजता मोठा छबिना, मोठ्या उत्साहात पार पडला दुपारी ३ वाजता धारेचा विधी आणि रात्री १२ वाजता रिंगावण विधी पार पडणार आहे. गेली दोन दिवस झाले तीर्थक्षेत्र येराड नगरीत हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. गुरुवारी रात्री येराड येथून देवाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या व ग्रामस्थ नेरळे गावाला येडोबा देवाची बहीण असलेल्या जानुबाई देवीला. वाजत-गाजत येराड येथे आणण्यात आले. त्यानंतर सासनकाठी व सुवासिनींसह देवीला मंदिरात आणून शुक्रवारी पहाटे येडोबा व श्री क्षेत्र येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेतील पहिला छबिना शुक्रवारी ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला.
जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. सकाळी १० वाजता मानकऱ्यांसह भाविकांचा नैवेद्य कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजता पहिल्या छबिन्यास सुरुवात झाली. सातारा, सांगली, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील सासनकाठ्या, झेंडे व येडोबा-जोगेश्वरी देवीच्या पालख्या मंदिर प्रदक्षिणेस निघाल्यानंतर छबिना रंगात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘चांगभलं’च्या जयघोषात भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून छबिना पूर्वेकडील नाईकबा देवाच्या भेटीनंतर छबिना संपन्न झाला.
येडोबा यात्रेसाठी सुमारे १२५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फाटा तैनात केला जातो. मात्र, यंदा मोजकेच पोलिस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी दिसून आले.
सासनकाठी माघारी..
सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील मानाची सासनकाठी येराडला घेऊन येत असताना सोबतच्या एका भाविकाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित सासनकाठी माघारी नेण्यात आली.
येराडमध्ये ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर
आज यात्रेच्या मुख्य दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल; शनिवारी दुसरा छबिना उत्साहात
कराड (वार्ताहर)
कोयनानगर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेतील पहिला छबिना शुक्रवारी ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. मानाच्या सासनकाठ्या व हजारो भाविक या छबिन्यात सहभागी झाले होते.
शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी १ वाजता मोठा छबिना, मोठ्या उत्साहात पार पडला दुपारी ३ वाजता धारेचा विधी आणि रात्री १२ वाजता रिंगावण विधी पार पडणार आहे. गेली दोन दिवस झाले तीर्थक्षेत्र येराड नगरीत हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. गुरुवारी रात्री येराड येथून देवाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या व ग्रामस्थ नेरळे गावाला येडोबा देवाची बहीण असलेल्या जानुबाई देवीला. वाजत-गाजत येराड येथे आणण्यात आले. त्यानंतर सासनकाठी व सुवासिनींसह देवीला मंदिरात आणून शुक्रवारी पहाटे येडोबा व
श्री क्षेत्र येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेतील पहिला छबिना शुक्रवारी ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला.
जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. सकाळी १० वाजता मानकऱ्यांसह भाविकांचा नैवेद्य कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजता पहिल्या छबिन्यास सुरुवात झाली. सातारा, सांगली, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील सासनकाठ्या, झेंडे व येडोबा-जोगेश्वरी
देवीच्या पालख्या मंदिर प्रदक्षिणेस निघाल्यानंतर छबिना रंगात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘चांगभलं’च्या जयघोषात भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून छबिना पूर्वेकडील नाईकबा देवाच्या भेटीनंतर छबिना संपन्न झाला.
यात्रेकरूंना ट्राफिकचा फटका तब्बल पाच किलोमीटर पर्यंत ट्राफिकच्या रांगाचा रांगा त्यामुळे भाविकांना अक्षरशा भर उन्हात चालत जावे लागले.येडोबा यात्रेसाठी सुमारे १२५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फाटा तैनात केला जातो. मात्र, यंदा मोजकेच पोलिस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी दिसून आले.




