भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
Home » Uncategorized » क्राईम डायरी » शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका

शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका

शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा

अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका

नवी दिल्ली : शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.

गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेब टाळा

शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे.

संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याचे निर्देश

व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस

भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस  संघटित परीक्षा गैरप्रकारांत

Live Cricket