गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव! पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद
Home » राज्य » मौजे पार येथिल आई रामवरदायिनी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मौजे पार येथिल आई रामवरदायिनी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मौजे पार येथिल आई रामवरदायिनी देवीच्या यात्रेस प्रारंभ.

पार्वतीपूर पार, ४ मे २०२४: समर्थ रामदास स्वामी यांनी प्रसिद्ध तुळजा भवानी हीच श्री आई रामवरदायिनी असे जिचे वर्णन केले आहे. अशा या श्री आई रामवरदायिनी मातेचे ऐतिहासिक किल्ले प्रतापगङाच्या पायथ्याशी मातेचे पुरातन मंदीर घनदाट जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वरच्या पश्चिमेला २० कि.मी अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या ऐतिहासिक श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्री आई रामवरदायिनी देवी यांचा वार्षिक यात्रोत्सव चैत्र कृष्ण द्वितीया, शके १९४६ रविवार दिनांक ५ मे २०२४ ते वैशाख शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक १३ मे २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे.

या यात्रोत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवारी (५ मे) सकाळी आई श्री रामवरदायिनी मातेस तसेच देवदेवतांना अभिषेक(घाटमाथा)येथे आणि दुपारी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी पालखी मिरवणूक आणि रात्री सासन काठी उभारणीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (६ मे) कुमठे गावची ग्रामदेवता श्री झोळाई माता आणि शिरवली गावचे ग्रामदैवत श्री जननी कुंभळजाई यांचे आगमन होणार आहे. याच दिवशी रात्री ४३ गावातील देवांचे विंङे वर्तविण्याचा महत्वाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी (७ मे) सकाळी ९ ते १२वा.श्रींची महापुजा ,रात्री ९ ते ११वा.विविध गावातील देवदेवतांचे आगमन तसेच बगाङ कार्यक्रम रात्री ११ ते १२ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानंतर मनोरंजनपर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार (८ मे) ते रविवार (१२ मे) दरम्यान सकाळी ११ ते १२ महाआरती आणि मंदिर प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. दररोज रात्री ९ ते ११ ढोल-लेझीमच्या साथीने देवीची महाआरती आणि मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. यानंतर मनोरंजनपर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी (१० मे) सायंकाळी ४ ते ५ महिलांसाठी हळदी कुंकु कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी (११ मे) रोजी श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसोंङ यांनी सकाळी ९ ते ५ सर्व रोग निदान शिबीर आणि मोफत उपचार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रविवारी (१२ मे) दुपारी ३ ते ६ होम हवन आणि इतर विधी संपन्न होतील. रात्री ९:३० ते ११ शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे स्वागत आणि बक्षीस समारंभ होणार आहे. यानंतर रात्री १२ ते ४ श्री वरदायिनी माता तरुण नाट्य मंडळ चिंचणी यांचे ५९ वे नाट्य “तुफान विनोदी नाटक” सादर होणार आहे.

सोमवारी (१३ मे) पहाटे ४:३० ते सकाळी ११ छबिना आणि गावातून पालखी मिरवणूक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ११ ते १ लळीत, लघुरुद्राभिषेक, होम समाप्ती आणि महाआरती होईल. यानंतर महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे.

सर्व भाविक भक्तांना आई श्री रामवरदायिनी मातेच्या यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आणि देवीचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थ मंङळ पार्वतीपूर पार यांच्याकङून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी आंबेनळी घाटातून मुंबई,

Live Cricket