यशोदा पब्लिक स्कूलची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
यशोदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल सर्वोत्तम
यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश.सातारा येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल काल प्रदर्शित झाला ज्यामध्ये शौर्य काकडे (90.67%), प्रशंसा बोबडे (88.33%), ओम भारती (84.50%), स्वीटी यादव (83.17%), पार्थ जगदाळे (82.83%) यांनी गुनानुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले. यासोबतच यशोदा पब्लिक स्कूलचा दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल हा 96% इतका लागला आहे.
यशोदा पब्लिक स्कूलमध्ये प्ले ग्रुप ते बारावीपर्यंत चे प्रवेश उपलब्ध आहेत. विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करणाऱ्या आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले आहे, असे प्राचार्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जडणघडणीमध्ये दहावीचा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा अधिक प्रगत घडविण्यासाठी दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. पालकांनी देखील सजगपणे आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष देणे आवश्यक बनते.
यशोदा पब्लिक स्कूलच्या या निकालाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे, सल्लागार समितीचे सदस्य आणि प्राचार्य यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.