सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा’ चे डी. फार्मसी विभागास एम.एस.बी.टी.ई कडुन ‘एक्सलेंट’ ग्रेड प्रदान

यशोदा’ चे डी. फार्मसी विभागास एम.एस.बी.टी.ई कडुन ‘एक्सलेंट’ ग्रेड प्रदान

यशोदा’ चे डी. फार्मसी विभागास एम.एस.बी.टी.ई कडुन ‘एक्सलेंट’ ग्रेड प्रदान

बाह्य परीक्षण समितीकडून उत्कृष्ट दर्जा संपादनाची परंपरा कायम

 यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी ऑफ डी. फार्मसी विभागास, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत नेमण्यात आलेल्या एक्स्टर्नल इन्स्टिट्यूट मॉनिटरिंग कमिटी कडून उत्कृष्ट दर्जा (एक्सलंट ग्रेड) प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी परीक्षण करण्यात आले होते. 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवणारे शैक्षणिक संस्थांचे समितीकडून परीक्षण करण्यात येते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता आणि त्याची व्यापकता या प्रमुख धर्तीवर हा परीक्षण कार्यक्रम राबविला जातो. 

बाह्य परीक्षण समिती म्हणजेच एक्स्टर्नल मॉनिटरिंग कमिटी मार्फत हे परीक्षण केले जात असल्यामुळे शैक्षणिक संस्था त्याकडे आव्हान आणि संधी या दुहेरी नजरेतून पाहतात. शैक्षणिक साधनांची उपलब्धता, ग्रंथालयातील संदर्भग्रंथांची उपलब्धता, विद्यार्थ्यांकडून या संदर्भग्रंथांची केले जाणारे वाचन आणि त्याची वारंवारता, संगणक प्रयोगशाळा तसेच संगणक प्रणालीचा वापर, प्रयोगशाळा सुसज्ज रूप आणि त्यातील साधनांची उपलब्धता, दरवर्षी होणारे प्रवेश आणि महाविद्यालय असणारी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची पसंती, मुलामुलींसाठी उपलब्ध असणारे वसतिगृह तेथील स्वच्छता आणि सुरक्षितता, शैक्षणिक वर्गातील विद्यार्थ्यांचे निकालाची टक्केवारी, शिक्षकांकडून केले जाणारे शोध निबंध, शिक्षकांमार्फत केले जाणारे तज्ञ चर्चासत्रातील योगदान, सामाजिक जाणीवेचा भावनेतून राबवले जाणारे समाजाभिमुख उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामंजस्य करार या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.

यशोदा शिक्षण संस्थेतील विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि व्यवस्थापनाचा उत्तम शिक्षणासाठी चा कटाक्ष यामुळे हे यश मिळवणे शक्य झाल्याचे मत फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.विवेक कुमार रेदासनी यांनी व्यक्त केले. फार्मसी विभागाच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे, कुलसचिव, सहसंचालक, प्राचार्य, यांनी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.

विभाग प्रमुख प्रा.आशिष थोरात, प्रा.स्वप्नाली पाटील, प्रा. नाझिया बागवान, प्रा. आशिष भोंगळे, प्रा. अमृता सोनमळे, प्रा.पूजा कदम, प्रा.श्रोनवी पवारआणि शिक्षकांनी या बाह्य परीक्षणासाठी विशेष तयारी करून हे यश संपादन केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket