Home » राज्य » प्रशासकीय » भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग विषयावरील कार्यशाळा संपन्न

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग विषयावरील कार्यशाळा संपन्न

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग विषयावरील कार्यशाळा संपन्न

सातारा दि.5: केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे “केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग व ” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  

 कार्यशाळा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी वरिष्ठ भूजलवैज्ञानिक उपेंद्र धोंडे, पाणी फाउंडेशन डॉ . अविनाश पोळ, प्रज्ञा माने-भोसले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, डॉ. मेघा शिंदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे गौरव चक्के, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, अरुण दिलपाक यांच्यासह राजेंद्र शेलार, बाळासाहेब शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थितीत होते.

 निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी भूजल माहिती प्रसारामध्ये CGWB च्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी CGWB आणि GSDA च्या भूजल डेटाबेसचा वापर करून सर्व संबंधित विभागांमध्ये सुसंवादी आणि व्यापक धोरण अंमलबजावणीसाठी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. धोंडे यांनी राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण यावर सादरीकरण केले तसेच सातारा जिल्ह्यासाठीचे राष्ट्रीय एक्विफर मॅपिंग (NAQUIM) निष्कर्षही सादर केले. तसेच CGWB डेटा पोर्टल, INGRES, आणि WRIS चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले तसेच माहिती प्रसारण संदर्भातील सुसंवादाने क्षेत्रीय स्तरावर नियोजन आणि निर्णय घेण्यास मदत असेही त्यांनी सांगितले. 

 डॉ.अविनाश पोळ यांनी प्रभावी जलव्यवस्थापनाची गरज अधोरेखित केली आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या तांत्रिक माहितचा स्थानिकस्तरावर प्रभावी वापर करण्याचे आश्वासन दिले. 

डॉ . मेघा शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विभागांना या संसाधनांचा जिल्हास्तरीय नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये, विशेषतः गावातील जलसुरक्षा योजनांच्या तयारीत सक्रियपणे वापर करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणार असल्याचे सांतगितले.

कार्यशाळेत कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा” या कॉफी टेबल पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात आले.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket