Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी संघर्ष नव्हे लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात विद्या पोळ यांचे प्रतिपादन

स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी संघर्ष नव्हे लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात विद्या पोळ यांचे प्रतिपादन 

स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी संघर्ष नव्हे लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात विद्या पोळ यांचे प्रतिपादन 

सातारा –स्त्रीमुक्तीसाठी केला जाणारा सामाजिक संघर्ष म्हणजे पुरुषांशी केलेला संघर्ष नाही. स्त्रीच्या सक्षमीकरणाचा तो संघर्ष आहे . स्त्री आणि पुरुष यांच्यातील हा संघर्ष आता कमी होण्याची गरज आहे असे प्रतिपादन लेखिका विद्या पोळ जगताप यांनी केले. येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहांमध्ये आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या पुढाकाराने लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत विद्या पोळ यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेव्हा त्या बोलत होत्या. वैदेही कुलकर्णी यांनी विद्या पोळ यांच्याशी संवाद साधला विद्या पोळ म्हणाल्या, स्त्रीवादी असणे किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणे म्हणजे पुरुषांशी संघर्ष करणे असे नव्हे स्त्री मुक्ती चळवळीच्या काही कल्पना ठरवून गेल्या आहेत त्यातूनही बाहेर येण्याची गरज आहे सामाजिकदृष्ट्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यातील हा संघर्ष आता कायमस्वरूपी संपण्याची गरज आहे विद्या पोळ यांची बाय ग ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यापूर्वी त्यांची जगणं कळले तेव्हा ही कादंबरी आणि देव चाफा हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे या तीन पुस्तकांच्या निमित्ताने बोलत असताना विद्या पोळ यांनी यांनी आपल्या लेखनामागील प्रक्रिया स्पष्ट केली बाय ग ही कादंबरी हा विविध स्त्रियांच्या अनुभवांचे एकत्रीकरण असून हा विषय नेहमीच्या पद्धतीने कादंबरीच्या फॉर्ममध्ये बांधण्यात आलेला नाही विविध स्त्रियांच्या अनुभवाच्या निमित्ताने स्त्रियांना सहन करावे लागणारे विविध प्रश्न आणि समस्या यांची गुंफण या कादंबरीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलत असताना ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी स्त्रीमुक्ती केव्हा स्त्रीवाद याबाबत जी काही गृहीतके किंवा संकेत ठरून गेले आहेत त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे असे स्पष्ट केले स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न मांडण्याव्यतिरिक्त आता पुरुषांनी सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनातून या समस्यांचा वेध घेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर दिपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख संदीप श्रोत्री श्रीराम नानल उपस्थित होते या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून स्वाती राऊत यांनी काम पाहिले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket