महाबी फाऊंडेशनतर्फे म’श्वरमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
महाबळेश्वर : समाजबांधणी व कुटुंब उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची असते. स्त्री भ्रूण हत्या, समान वेतन, महिला हिंसाचार, अत्याचार व बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे असून त्याची यशस्वी अंमलबजावणीही होत आहे, असे प्रतिपादन न्या. ए. डी. मारगोडे यांनी केले.
महाबळेश्वर तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ व महाबी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधत कायदेविषयक, शैक्षणिक व आरोग्यविषयक जनजागृती शिबिर पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी बांधकाम उपअभियंता अजय देशपांडे, सहा. गटविकास अधिकारी सुनील पार्टे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजयकुमार दस्तुरे, महाबी फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रदीप मोरे उपस्थित होते.
महाबी फाऊंडेशनच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान न्या. ए डी मारगोडे यांच्या हस्ते करण्यात आला.अॅड. विजयकुमार दस्तुरे व रोहिणी वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले.
पार्टे यांनी महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. संरक्षण अधिकारी नीलम चिकणे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याची माहिती दिली. बालविकास अधिकारी सौ. भणगे यांनी लेक लाडकी योजनेची माहिती दिली. अॅड. कोमल ढेबे यांनी हुंडा प्रतिबंध कायदा, तर अॅड. काजल ढेबे यांनी महिला दिनाची माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती रोहिणी वैद्य, डॉ. भरती बोधे, सौ. नीता भाटिया, प्रा. अरुणा कोरे, अॅड. मेघा पवार, ताहेरा कुरेशी, वैशाली कदम, दीपाली हिरवे, पूजा शिंदे उतेकर, मेघा गावडे, अक्षया चौरसिया, सारीका पुजारी व सहकारी (मैत्रीण बचत गट), सुशिला दळवी व सहकारी (रणरागिणी महिला बचत गट), मिनाक्षी पवार व सहकारी (वक्रतुंड महिला बचत गट), अनुराधा शिंगरे, रूपाली केळगणे, छाया जाधव, स्वाती नाइलकर, धनश्री वाळवेकर, अलका खामकर, कोमल मोरे, यशोदा शर्मा, शोभा गेणु शिंदे, शोभा अशोक शिंदे, वंदना घाडगे, शलिमा वारूणकर, संजना बिजलानी, नाजनीन मानकर, आलमीन अत्तार, अक्सा मुजावर, रिजवाना मुजावर, यशोदा जाधव, मांघर गामपंचायत सदस्या दिपाली जाधव, पुष्पा जाधव, संगिता जाधव, मंगल ढेबे, ज्योती कदम, खतीजा वारूणकर, रेखा जगदाळे या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेला महिलांचा सन्मान करण्यात आला. हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी व सहकाऱ्यांनी मनोरंजनात्मक खेळ घेतले. सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान शिर्के, आदेश गावडे, बाळू आखाडे, रेश्मा पाटणे, तृप्ती शिपटे,रेणुका ओंबळे, वैशाली चौरासिया शैलेश कदम अंकुश शिंदे विनायक साळवी राहुल सुपेकर संतोष जंगम अनिल जाधव संतोष शिंदे सुनील बिरमाणे संजय जंगम विजय साळुंखे जावेद नालबंद संतोष कदम, रमेश पवार, संतोष माजलकर आदींनी परिश्रम घेतले.
