वर्ये पूलावर फूटभर खड्डेच खड्डे प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालक त्रस्त
वर्ये – सातारा पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास करताना वर्ये गावच्या हद्दीत वेण्णा नदीच्या पुलावरील रस्त्यावर जागोजागी पडलेले फुटभर खड्डे वाहन चालकांना व नागरिकांसाठी धोकादायक ठरू पाहात आहेत. पडलेले फुटभर खड्ड्याकडे प्रशासनाची झालेले दुर्लक्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पडलेले खड्डे त्यातच मुसळधार पडणाऱ्या पावसाची पाणी या खड्ड्यात साचल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यातच हा पूल अरुंद असल्याने खड्डे चुकविताना वाहन चालकाला मोठी सर्कस करावी लागत आहे. या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने येथील खड्डे तातडीने मुजविण्यात यावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. याबाबत माध्यमानी ही अनेकदा या प्रश्ना बाबत आवाज उठविला आहे. पुणे मुंबई व महाबळेश्वर वाई पाचगणी कडे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास अधिक होत असून पडलेल्या खड्ड्यात वाहने आढळून वाहनाचे ही मोठे नुकसान होत आहे .सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या मार्गावरील खड्डे प्रशासनाने मुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात पूर्ण पणे अंधाराचे साम्राज्य असल्याने वाहन चालकांना याचा धोका अधिक संभावतो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या पुलाची रुंदीकरण करून येथील नेहमी पडणाऱ्या खड्ड्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे संपूर्ण राज्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्डेबाबतचे आदेश संबधित यंञणेला दिलेली आहेत 31 सप्टेंबर 2024 पर्यंत रस्त्यावरील पडलेले खड्डे मुजवावेत असे आदेश असताना लालफीती कारभाराचा ठिसूळ कारभार येथे दिसून येतो वर्ये पुलावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे .विशेषता वर्ये व लिंब परिसर हा शैक्षणिक हॅब झाल्याने विद्यार्थ्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस पावले त्वरित उचलावीत व खड्डे मुक्त पुलाची ओळख निर्माण करा .
श्रीरंग काटेकर सातारा