Home » ठळक बातम्या » आणे गावच्या शेतकऱ्यांच्या सुपुत्राचे राज्यसेवा परीक्षेत सुयश

आणे गावच्या शेतकऱ्यांच्या सुपुत्राचे राज्यसेवा परीक्षेत सुयश

  • आणे गावच्या शेतकऱ्यांच्या सुपुत्राचे राज्यसेवा परीक्षेत सुयश.

तांबवे –आणे ता. कराड येथील विश्वजीत विलास देसाई. याने नुकताच राज्यसेवेचा जो निकाल जाहीर झाला यामध्ये राज्यात 324 वी रँक मिळवली. त्याची महिला बाल विकास अधिकारी वर्ग 2 या पदावर निवड झाली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, गेली 7 वर्षे संघर्ष करत चार वेळा मुलाखत देऊन ही निवड झाली नव्हती. अखेर भगवान के यहाँ ..देर है अंधेर नही या उक्तीप्रमाणे ध्येयाचा ध्यास घेऊन आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवून, ज्याप्रमाणे जोपर्यंत डोळ्यापुढे खुले आकाश आहे, मनाला आशेचे पंख आहेत आणि अंत:करणात जिद्द आहे तोपर्यंत ध्येयप्राप्तीपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असा दृढ विश्वास ठेवून अखेर यशाला गवसणी घातली. या प्रवासात त्याला त्याचे मित्र IPS तुषार देसाई यांची खंबीर साथ मिळाली. तसेच आजोबा दिनकर देसाई , चुलते निवास देसाई ,आई वडील यांनी मोलाची साथ दिल्यामुळे घरातील सर्वांचेच स्वप्न साकार झाले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन, प्रामाणिक कष्ट ,सकारात्मक दृष्टिकोन, अपयशातून शिकण्याची वृत्ती, सातत्य , आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. एका शेतकरी मुलाची यशोगाथा पाहून गावातील युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket